होमगार्ड अधिकारी मानसिक छळ करत असल्याची महिलांची तक्रार !

April 6, 2011 11:58 AM0 commentsViews: 38

06 एप्रिल

सोलापूर जिल्ह्यातील होमगार्ड पथकातील अधिकारी मानसिक छळ करून शरीरसुखाची मागणी करत असल्याची तक्रार होमगार्ड मधील महिलांनी केली. संबधीत महिलांनी कोल्हापूर पोलीस महानिरीक्षकांकडे ही तक्रार नोंदवली. सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते आणि सांगोला पथकाचे केंद्रनायक जे.के.पवार, समादेशक सतीश इंगवले आणि लिपीक गावडे यांनी कामाचे निमित्त सांगत शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप या महिलांनी केला आहे. याबाबत महिलांनी सोलापूर पोलिसांकडे तक्रारही केली होती. पण पोलिसांनी त्याची दखलही घेतली नाही. त्यामुळेच ह्या तिन्हीही कोल्हापूरच्या महिला पोलीस महानिरीक्षक भगवंतराव मोरे यांच्याकडे तक्रार देण्यासाठी आल्या. पण ते नसल्यामुळे ह्या महिलांना त्याच्या तक्रार अर्जावर फक्त पोहोच देण्यात आली. ही बातमी करण्यासाठी गेलेल्या मीडियाच्या प्रतिनिधींनाही यावेळी पोलिसांनी धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

close