‘तार्‍यांचे बेट’ लवकरच रिलीज

April 6, 2011 1:16 PM0 commentsViews: 3

06 एप्रिल

एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्या बालाजी टेलिफिल्मसची निर्मिती असलेला पहिलाच मराठी सिनेमा 'तार्‍यांचे बेट' लवकरच रिलीज होणार आहे. त्यानिमित्ताने या सिनेमाचे स्पेशल स्क्रींनिंग नुकतंच मुंबईत ठेवण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगसाठी मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकार यावेळी उपस्थित होते. या सिनेमाचे दिग्दर्शन किरण यज्ञोपवित यांनी केलं आहे. सचिन खेडेकर,आश्विनी गिरी यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी स्क्रींनिंग झाल्यानंतर या सिनेमाचं कौतुक केलं.

close