बोगस सातबारा वापरून 22 कोटींचं बनावट कर्ज !

April 6, 2011 1:37 PM0 commentsViews: 12

06 एप्रिल

शेतकर्‍यांच्या नावाने बनावट कर्ज प्रकरण केल्याचा प्रकार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उघड झाला. प्रकरण उघड होऊन 8 दिवस झाले तरी अजून कारवाई झालेली नाही. चौकशी अहवाल आल्यावरच कारवाई केली जाईल असं बँकेचे अध्यक्ष आत्माराम कलाटे यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील सोमेश्वरनगर विकास सोसायटीचे हे बोगस प्रकरण आहे. सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष शहाजी काकडे यांचे बंधू राजेंद्र काकडे यांच्यावर या प्रकरणी आरोप झाले आहेत.

22 कोटी रूपयांचे पीककर्ज देण्यात जिल्हा बँकेने सोसायटीच्या माध्यमातून दिलं पण या कर्जाकरता सुमारे 90 शेतकर्‍यांच्या नावाने बोगस सातबारा उतारे देण्यात आले. त्यांची जमीन तारण दाखवून कर्जवाटप करण्यात आलं. बँक प्रशासनाने या प्रकरणाचा अहवाल मागवला असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे या बँकेचे डायरेक्टर आहेत. यापूर्वी अनेक वर्ष ते स्वत: या बँकेचे अध्यक्ष होते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी विकास सोसायटीचे चेअरमन व्हायला टग्याच लागतो सादासुधदी सरळ माणूस चालत नाही असं प्रांजळ विधान पवारांनी केलं होतं. आता त्यांच्याच अधिपत्याखालील बँकेचं बोगस कर्ज प्रकरण उघड झाल्याने टगेगिरीचं वास्वच समोर आलंय.

close