नागपूरमध्ये झाली राष्ट्रीय जर्मन शेफर्ड चॅम्पियनशिप

November 9, 2008 5:57 AM0 commentsViews: 63

9 नोव्हेंबर, नागपूरकल्पना नळसकरनागपूरमध्ये सहावी राष्ट्रीय स्तरावरची जर्मन शेफर्ड स्पेशालिटी चॅम्पियनशिप नुकतीच पार पडली. या 'जर्मन शेफर्ड डॉग शो ' मध्ये 60 ते 70 प्रतीच्या जर्मन शेफर्ड डॉगनी भाग घेतला. यानिमित्ताने देशभरातल्या नामवंत जर्मन शेफर्डसा पहाण्याची संधी दर्शकांना मिळाली. या 'जर्मन शेफर्ड डॉग शो ' मध्ये 60 ते 70 प्रतीच्या जर्मन शेफर्ड कुत्र्यांनी भाग घेतला.नागपूरच्या या ग्राउन्डवर ही चॅम्पियनशिप पार पडली. जर्मन शेफर्डच्या शरीरयष्टीचं आणि सुदृढतेचं प्रदर्शन यात पहायला मिळालं. रॅम्पवर सर्व सहभागी जर्मन शेफर्ड्सनी आपल्या मालकांसोबत आपली कमाल दाखवली. जबलपूरहून आलेल्या बॉबी लांबा, यांच्या कुत्र्याचा या स्पर्धेत पहिला नंबर आला. ' जर्मन शेफर्ड जातीचे कुत्रे फार हुशार असतात. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे जण त्यांना ट्रेनिंग देऊ शकतात ' असं बॉबी लांबा यांनी सांगितलं. ' लोकांना जर्मन शेफर्ड जातीचे कुत्रे फार आवडतात. पण त्याची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. तरच त्याची प्रत चांगली राहते ' असं जर्मन शेफर्ड डॉग क्लबचे सेक्रेटरी विशाल मेंढे यांनी सांगितलं. या आगळ्या वेगळ्या चॅम्पियनशिपला प्राणीप्रेमींचाही चांगला प्रतिसाद मिळाला.

close