लोकपाल विधेयकाच्या मंत्रिगटातून शरद पवार बाहेर

April 6, 2011 3:36 PM0 commentsViews: 1

06 एप्रिल

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे पहिले लक्ष्य ठरलेत शरद पवार. केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार अखेर लोकपाल विधेयकाच्या मंत्रिगटातून बाहेर पडले आहेत. या मंत्रिगटात भ्रष्ट नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्याशी काय चर्चा करायची, असं म्हणत अण्णांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला होता.

त्यावर दुखावलेल्या पवारांनी केवळ लोकपाल विधेयकाच्या मंत्रिगटातूनच नाही तर सर्वच विषयांच्या मंत्रिगटातून बाहेर पडायला तयार असल्याचं म्हटलं होतं. पण पवारांनी केवळ मंत्रिगटाचाच नाही तर मंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा, अशी मागणी अण्णांनी केली आहे. एक पवार गेले तर दुसरे पवार येतील, त्यामुळे व्यक्ती जाऊन उपयोग नाही, आमची मूळ मागणी संयुक्त समितीची आहे, ती अजूनपर्यंत मंजूर झालेली नाही, असं अण्णांनी म्हटलं आहे.

close