सचिनच्या म्युझिअमसाठी पुणे महापालिकेचा पुढाकार

April 6, 2011 4:32 PM0 commentsViews: 3

06 एप्रिल

मुंबईत जागेअभावी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर म्युझिअम होऊ शकलं नसताना पुणे महापालिकेने मात्र या म्युझिअमसाठी 1 एकर जागा द्यायचं ठरवलं आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्याच्या गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये या म्युझिअमकरता 40 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. पण मुंबईत जागा उपलब्ध नसल्याने ही योजना अस्तित्वात येऊ शकली नाही. पुणे महापालिकेने मात्र तयारी दर्शवत बाणेर – बालेवाडी परिसरातील जागा या म्युजियमकरता देऊ केली.

close