अण्णांना पाठिंबा देत आमिरचं पंतप्रधानांना पत्र

April 6, 2011 5:28 PM0 commentsViews: 2

06 एप्रिल

अण्णांच्या आंदोलनला सेलिब्रिटींनी ट्विटरवरून आपला पाठिंबा दिला. तर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननंही अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आमिरने अण्णांना त्यासंबंधी एक पत्र लिहिलं. तसेच लोकपाल विधेयकाला आपला पाठिंबा असल्याचे पत्र आमिरनं पंतप्रधानांनाही लिहिलंय.

आमिरचं पंतप्रधानांना पत्र

अण्णांच्या म्हणण्यात तथ्य आहे असं मला सांगावंसं वाटतंय. भ्रष्टाचाराने देशातील अब्जावधी लोकांना वेढलंय त्यातलाच मीसुद्धा एक आहे. मला मोठी आशा आहे की, आपण अण्णांच्या मागण्यांकडे लक्ष द्यालं. मला आपल्याला सांगावंसं वाटतंय की, देशातील जनता हळूहळू अण्णांच्या पाठीशी उभी राहत ाहे. आणि एका 72 वर्षाच्या थोर पुरूषाच्या या लढ्याला लोक सलाम करत आहे.

close