स्पेक्ट्रम प्रकरणी 25 एप्रिलला दुसरे चार्जशीट दाखल करणार

April 6, 2011 5:36 PM0 commentsViews: 7

06 एप्रिल

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी डीएमकेच्या खासदार आणि करुणानिधी यांची मुलगी कनिमोळी यांचं नावही आता सीबीआयच्या दुसर्‍या चार्जशीटमध्ये आरोपपत्रात येण्याची शक्यता आहे. येत्या 25 एप्रिलला हे चार्जशीट दाखल केलं जाणार आहे. स्वान टेलिकॉमकडून कलाईनार टीव्हीला 200 कोटी रूपये देण्यात आले. या व्यवहाराचाच प्रमुख मुद्दा यात असणार आहे. 2 जी स्पेक्ट्रमच्या सर्व लाभधारकांवर चार्जशीट दाखल केलं जाणार आहे. लूप टेलिकॉमही सीबीआयच्या रडारवर आहे.

close