पाकिस्तानच्या कारागृहातून 27 वर्षांनंतर गोपालदास यांची अखेर सुटका

April 7, 2011 9:58 AM0 commentsViews: 1

07 एप्रिलगेल्या 27 वर्षापासून पाकिस्तानच्या कारागृहात खितपत पडलेले भारतीय नागरिक गोपाल दास आज मायदेशी परतले आहे. गोपाल दास यांच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. वाघा सीमेवर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. याआधी 1984 साली गोपाल दास यांना पाकिस्तानच्या कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गोपाल दास अपघाताने पाकिस्तानच्या सीमेत गेले होते. भारताच्या सुप्रीम कोर्टाने पाकिस्तानचे राष्ट्रपती झरदारी यांना गोपाल दास यांची सुटका करण्याची विनंती केली होती. या विनंतीनंतर गोपालदास यांची सुटका करण्यात आली. त्यामुळे तब्बल तीन दशकांच्या वनवासानंतर गोपालदास यांना जन्मभूमीचे दर्शन घेता आलं.

close