मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासात गुजरात पोलिसांकडून अडथळे

November 9, 2008 6:03 AM0 commentsViews: 2

9 नोव्हेंबर, गुजरातमालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासात आरोपींच्या समर्थनासाठी राजकीय पक्ष पुढे आले आहेत. पण आता प्रत्यक्ष तपास राजकीय हस्तक्षेप आणि अडवणूक सुरू झाली आहे. गुजरातमधून एका संशयिताला चौकशीसाठी एटीएसच्या ताब्यात देण्यास गुजरात पोलीस उघड अडवणूक करत आहेत.मालेगाव स्फोटांच्या तपासात अटक झालेल्या प्रज्ञा सिंगच्या निकटवर्तीय असलेल्या सुनील दहवाड या संशयिताला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या एटीएसच्या टीमची गुजरात पोलीस अडवणूक करताहेत. त्याला चौकशीसाठी ताब्यात देण्यासाठीसुद्धा वॉरंटची मागणी करत, गुजरात पोलिसांनी एटीएसला अडवलं आहे. सुनील दहवाड हा डांग जिल्ह्यातल्या शबरी आश्रमातून गेले चार महिने फरार असलेल्या स्वामी असीमानंद यांचा ड्रायव्हर होता.स्वामी असीमानंद यांनी चार वर्षापूर्वीच विश्व हिंदू परिषदेचं ' शबरी कुंभ ' या मेळाव्याचं आयोजन केल होतं. असीमानंद हे साध्वी प्रज्ञासिंग आणि विहिंपचे प्रवीण तोगडिया यांचे निकटवर्तीय समजले जातात आणि गेले चार महिने ते फरार आहेत. पण त्यांच्या ड्रायव्हरला ताब्यात देण्यावरुन गुजरात सरकारनी उघडपणे अडवणूक सुरू केली आहे.

close