आसेगावच्या यात्रेत काट्यांवर झोकून देण्याची अघोरी प्रथा

April 7, 2011 10:18 AM0 commentsViews: 6

07 एप्रिल

औरंगाबादजवळच्या आसेवाग आणि माळीवाडा येथील महादेवाची यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेत भाविक स्वत:हून काट्यांवर झोकून घेतात. त्यात ते जखमीही होतात पण परंपरा आणि नवस म्हणून ही अघोरी प्रथा अजूनही पाळली जाते. माळीवाड्यात कपडे घालून तर आसेवागात उघड्या अंगाने हे भाविक स्वत:ला काट्यावर झोकून देतात. महादेवाच्या काठीकडेे धावत जाऊन ही माणसं काट्यांवर जाऊन पडतात. हे भयानक दृश्य पाहायलाही प्रचंड गर्दी होते. ही जत्रा खरं तर सर्वधर्मसमभावाचेही प्रतिक आहे. लोकांनी एकत्र येऊन ही अघोरी प्रथा बंद करून या यात्रेतील चांगल्या परंपरा जपण्याची गरजही आता व्यक्त होऊ लागली आहे.

close