पुण्यातील येरवडा जमीन घोटाळ्यारून आरोप प्रत्यारोप

April 7, 2011 1:07 PM0 commentsViews: 1

07 एप्रिल

पुण्यातील येरवड्यामधील सर्व्हे क्रमांक 191 वरील वादग्रस्त जमिनीच्या वादावरुन विरोधक आणि सत्ताधार्‍यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रकरणाच्या माध्यमातून डी बी रियालिटीचे शाहिद बलवा यांच्याशी पवार कुटुंबीयांचे व्यावसायिक संबंध आहेत. असा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत केला होता.

पण शाहिद बलवा बांधत असलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलशी पंचशील टेकपार्कचा कोणताही संबंध नाही. शाहिद बलवा यांचं हॉटेल तयार होण्यासाठी पंचशील टेकपार्क बांधून तयार झाले होते. पंचशील टेकपार्कला पुणे महापालिकेचं कॉमन्समेंट सर्टीफिकेट 2004 मध्ये आणि ऑक्युपेंन्सी सर्टीफिकेट अर्थात भोगवटा प्रमाणपत्र 2006 मध्ये मिळालं होतं. तर शाहिद बलवा यांचा पर्यावरण मंजुरीचा अर्ज जून 2007 मध्ये आहे. म्हणजे तारखांचा मेळसुद्धा जमून येत नसल्याचे स्पष्ट झालंय. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी पवार कुटुंबीयांवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांनी जनतेची दिशाभूल केली, असा प्रती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

close