‘मिले सूर मेरा तुम्हारा’कारांचा आज वाढदिवस

April 7, 2011 11:41 AM0 commentsViews: 1

07 एप्रिल

मिले सूर मेरा तुम्हारातील पंडित रवीशंकर यांचा आज वाढदिवस आहे. रवीशंकर यांचा जन्म वाराणसीत झाला. त्यांनी त्यांचे भाऊ उदय शंकर यांच्या डान्स ग्रुपसोबत युरोप भारतातही भरपूर प्रवास केला.1938 मध्ये रवीशंकर यांनी नृत्य सोडलं आणि कायमचं सतार वादनाला वाहून घेतलं.

1944 मध्ये त्यांनी कंपोझर म्हणून काम करायला सुरूवात केली.सत्यजित रे यांच्या अपू त्रिलोगी यांच्यासाठी त्यांनी कंपोझर म्हणून काम पाहिलं. तर 1949 ते 1956 पर्यंत त्यांनी ऑल इंडिया रेडिओचे डायरेक्टर म्हणूनही काम पाहिलं.1956 नंतर त्यांनी युरोप आणि अमेरिकेचे दौरे सुरू केले आणि भारतीय संगीत पाश्चात्य देशांमध्ये नेण्याचं कामही.

यहुदी मेनन आणि हॅरिसन यांच्यासोबत त्यांनी परफॉरमन्सेस केले आणि त्यांना उदंड प्रतिसादही मिळाला. 1999 मध्ये या स्वररत्नाला भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं. त्यांना आतापर्यंत तीन ग्रॅमी अवॉर्ड्सही मिळाली आहेत. त्यांची मुलगी अनुष्का शंकर हिच्याबरोबरही त्यांनी अनेकदा परफॉरमन्सेस केले आहेत.

close