…मरणाच्या उबरठ्यावरून ती परतली

April 7, 2011 11:57 AM0 commentsViews: 5

गोविंद तुपे, मुंबई

07 एप्रिल

मुंबईत राहणार्‍या एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी हृदयाच्या रोगाने आजारी होती. तिच्या ऑपरेशनसाठी त्यांना एकवीस हजार रुपये कमी पडत असल्याची बातमी आयबीएन लोकमतने दोन वर्षापूर्वी दाखवली होती. ही बातमी पाहून त्या मुलीला मदतही मिळाली. आज ती मुलगी आपले जीवन आनंदानं जगतेय.

दोन वर्षापूर्वी घरातील कुठलही काम न करू शकणारी आश्विनी आज घरातील सर्व काम आनंदाने करताना दिसतेय. मुंबईतील चुनाभट्टी परिसरात राहणार्‍या या कुटुंबाचे उत्पन्न तसं बेताचच होतं. त्यातचं मुलीच्या आजाराचा खर्च कसा भागवायचा हा एक प्रश्न त्यांच्या समोर अभा होता.

त्यावेळी आयबीएन लोकमतने त्यांची ही करून कहानी लोकांसमोर आणल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. ठाण्याच्या विद्यार्थी विकास परीषदेनं या मुलीच्या ऑपरेशन साठी 21 हजार रूपयांची मदत आयबीएन लोकमतच्या माध्यमातून केली. त्यामुळे दोन वर्षापूर्वी जगण्यामरणाशी झुंज देणारी आश्विनी कांबळे आज आनंदाने जीवन जगतेय. आश्विनी कांबळे म्हणते की, मला आता आशेची किरण दिसतेय. घरातही चांगल वातवरण आहे. आश्विनीच्या ऑप्रेशनसाठी आयबीएन लोकमतनं एक माध्यम म्हणून निभावलेल्या भूमिकेबद्दल आश्विनीचा भाऊ बाबू कांबळे म्हणतो की, आम्ही मरणाच्या उबरठ्यावर होतो. आम्हाला आयबीएन लोकमतमुळे नविन जीवनदान मिळालं.

आपल्या आयुष्यातल्या जुन्या गोष्टी पाटीवर टाकून नविन जीवनाचा प्रवास सुरू केला आहे. पण आयुष्यातील मागील अनुभवावर बोलताना ती म्हणतेय. इतर कोणाच्याही वाट्याला अश्या वेदना येऊ नये. आणि अशा वेदनातून कोम जात असेल तर त्यांनाही अशीच मदत मिळावी ही अपेक्षा व्यक्त करतेय.

close