मुंबईत एक हजार लिटर कच्ची दारु जप्त

April 7, 2011 12:45 PM0 commentsViews: 11

07 एप्रिल

मुंबईच्या बांद्रा एक्साईज विभागाने अंधेरीतून जवळपास एक हजार लिटर कच्ची दारु जप्त केली आहे. नागप्पा धनगर यांच्या राहत्या घरातून ही दारु जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी नागप्पाला अटक केली. तर रंगम्मा धनगर ही महिला फरार झाली आहेत. ही दारु गुजरातमधुन मुंबईत आणल्याची माहिती पोलिसांनी दिली. वर्ल्ड कप विजयानंतर आनंद साजरा करण्यासाठी ही दारु मुंबईत आणल्याची माहिती आरोपीनं दिली. या दारुची किंमत बाजारात 80 हजारापेक्षा जास्त आहे. मुंबईत अशा प्रकारची दारु आणखी कुठे आयात केली गेली याचा तपास पोलीस करत आहे.

close