पुण्यात मनसेनं उघडकीस आणला धाण्याचा गैरव्यवहार

April 7, 2011 12:59 PM0 commentsViews: 2

07 एप्रिल

पुण्यातील मार्केट यार्डातील एका पेढीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं धाड घालून शासकीय गोदामातील धाण्याचा चाललेला गैरव्यवहार उघडकीस आणला. पुण्यातील गोदामातील गहू – तांदळांनी भरलेले ट्रक जे रेशन दुकानांमधे जाणं अपेक्षित असताना मार्केट यार्डातील एका पेढीवर आढळले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा रेशनवरील धान्याचा काळाबाजार असल्याचं सांगून कारवाईची मागणी केली.

close