नवी मुंबई मेट्रोचं काम एका महिन्यात सुरू होणार

April 7, 2011 4:57 PM0 commentsViews: 5

07 एप्रिल

मुंबई महानगर प्रदेशातील सोयी-सुविधांवर आज विधान परिषदेत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई आणि नवी मुंबईच्या दृष्टीने महत्वपूर्ण घोषणा केल्या. वरळी ते नरीमन पॉईंट हा प्रस्तावित सागरी सेतू रद्द करुन उंच खाबांवर तसेच किनार्‍यांवर भराव टाकून तर काही ठिकाणी भुयारी मार्ग तयार करुन रस्ता बांधला जाईल या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.

न्हावा शेवा- शिवडी सी लिंक एमएमआरडीएच बांधणार त्यासाठी व्हायेबिलिटी गॅप फंडिंगच्या माध्यमातून कमी व्याजदराने कर्ज उभारले जाईल. सुरूवातीला तीन लेनचा रस्ता आणि एक मेट्रो लेन असं बांधकाम केलं जाईल. त्यानंतर उर्वरित काम केलं जाईल. नवी मुंबई विमानतळाची निविदी प्रक्रिया येत्या 6 महिन्यात सुरू करणार आहे. मुंबई मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा या वर्षाखेरीस कार्यान्वित होईल. दुसर्‍या टप्प्याचं काम लवकरच सुरू करणार आहे. तर नवी मुंबईतल्या मेट्रो रेल्वेचं पुढच्या महिन्यात सुरू करणार आहेत.

close