अण्णांना पाठिंब्यासाठी पुण्यात 8 एप्रिलला उपोषण

April 7, 2011 5:20 PM0 commentsViews: 5

07 एप्रिल

अण्णा हजारेंच्या आंदोलनाला देशव्यापी पाठिंबा मिळत आहे. पुण्यातही महापालिकेच्या दारात अण्णांचे समर्थक धरणं आंदोलन करत आहे. त्याबरोबरचं मोठ्या संख्येनं पुणेकर या आंदोलनात सहभागी व्हायची इच्छा व्यक्त करत यासाठी लाक्षणिक उपोषण करत, घंटानाद करत आहे. पुण्यातल्या काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी 8 एप्रिलला पुणेकरांनी एक दिवसाचं उपोषण करायचं आवाहन केलंय. प्रत्येकानं आपल्या सोयीनुसार नाष्टा, दुपारचं जेवण. रात्रीचं जेवण यापैकी एक अथवा सर्व गोष्टी टाळून पुणे महापालिकेच्या दारात सुरू असलेल्या आंदोलनात सामील व्हावं असं आवाहन करण्यात आलंय.

close