पिंपरी-चिंचवडमध्ये गरीबांच्या जागेवर बलवाची घुसखोरी !

April 7, 2011 5:41 PM0 commentsViews: 5

07 एप्रिल

बांधकाम व्यावसायिक शाहीद बलवानी केलेली अनेक बेकायदेशीर प्रकरणं उघड होत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्येही असंच एक प्रकरण समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या 132 एकर जागेवर गरीबांसाठी गृहप्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र, मूळ निविदेत नाव नसतानाही शाहीद बलवाच्या डीबी रियालिटी कंपनीला प्रकल्पातील 51 टक्के भागीदारी देण्यात आल्याचे उघड झालं आहेत. त्यामुळे शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहेत.

पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या हद्दीत येणारी सेक्टर क्रमांक 12 मधील 132 एकर जागा. या जागेवर गरीबांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प उभारण्यात येणार होता. त्यासाठी चार ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. दीड महिन्यानंतर प्रकल्पाचे टेंडर जाहीर करण्यासाठी निविदाचे सीलबंद पाकिट उघडण्यात आलं. आणि शाहीद बलवाच्या डि.बी.रियालिटी कंपनीला प्रकल्पातील 51 टक्क्यांची भागीदारी देण्यात आली. मूळ निविदेत नाव नसतानाही बलवाच्या कंपनीला ही भागीदारी कशी दिली असा सवाल आता उपस्थित होतोय. याप्रकरणाबद्दल आम्ही प्राधिकरणाचे सध्याचे आयुक्त सुहास दिवसे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला परंतु आपली चूक नसल्याचे सांगत त्यांनी कॅमेर्‍यावर बोलण्यास नकार दिला.

तर शिवसेनेनंही थेट काँग्रेस-राष्ट्रवादीवरच आरोप करत कोर्टात धाव घेतली. विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी या प्रकणाच्या चौकशीची मागणी विधानसभेत केल्यानतंर या प्रकल्पाची निविदा रद्द करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. परंतु हा सगळा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने घडला. 132 एकर जागेवर तब्बल 2.5 एफएसआय कसा काय दिला गेला. आणि अधिकारात नसतानाही प्राधिकरणाने गरीबांसाठी प्रकल्प उभारण्यासाठी निविदा कशा मागवल्या हे प्रश्न अनुत्तरितच राहतात.

close