स्पेक्ट्रम प्रकरणी पंतप्रधान कार्यालयातील अधिकार्‍यांची चौकशी

April 7, 2011 6:22 PM0 commentsViews: 1

07 एप्रिल

उद्योगपतींची चौकशी केल्यानंतर संसदेच्या लोकलेखा समितीनं आता पंतप्रधान कार्यालयातल्या महत्त्वाच्या अधिकार्‍यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. प्रधान सचिव टी.के.ए. नायर आणि कॅबिनेट सेक्रेटरी के. एम. चंद्रशेखर यांना समन्स बजावण्यात आलंय. 16 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश लोकलेखा समितीने त्यांना दिले आहेत. कायदा सचिव डी. आर. मीना आणि ऍटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांनासुद्धा 15 तारखेला हजर राहायला सांगण्यात आलंय. गुलाम वहानवटी यांचं नाव सीबीआयने आपल्या चार्जशीटमध्ये साक्षीदार म्हणून नोंदवलं होतं.यापूर्वी उद्योगपती रतन टाटा, अनिल अंबानी आणि कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांची चौकशी या समितीनं केली.

close