नागपूर टेस्टमध्ये भारतीय टीम फ्रंट फूटवर

November 9, 2008 7:17 AM0 commentsViews: 2

9 नोव्हेंबर नागपूर,विरेंद्र सेहवाग आणि मुरली विजय यांनी भारताला दुस-या इनिंगमध्ये भक्कम सुरुवात करून दिली. दोघांनी हाफ सेंच्युरी पार्टनरशिप केली. ती सुद्धा साडे तीन रन्सच्या रन रेटने. त्यामुळे भारताकडे आता जवळ जवळ दोनशे रन्सची आघाडी आहे. भारताकडे काल 86 रन्सची आघाडी होती. चौथ्या दिवशी सेहवाग आणि विजय यांनी सावधपणे सुरुवात केली. पण खराब बॉलचा समाचार घेण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. सेहवागने जबाबदारीने बॅटिंग करत हाफ सेंच्युरी ठोकली. त्याची ही सतरावी हाफ सेंच्युरी. यात त्याने सहा फोर मारले. भारतीची पहिली विकेट शेन वॉटसनने घेतली त्याने 41 रन्स केले. दुस-या इनिंगमध्ये तीनशे ते साडे तीनशे रन्सच्या आसपास स्कोअर केल्यास भारताला ही टेस्टही जिंकण्याची आशा बाळगता येईल. राहुल द्रविड पुन्हा अपयशी ठरला त्याला वॉटसनने 3 रन्सवर आऊट केलं. सेहवाग सेंच्युरी फक्त आठ धावांनी हुकली. ब्रेट लीच्या लेगला वळलेल्या बॉलने त्याला चकवलं आणि विकेट किपर हॅडिनने कॅच टिपण्यात कसूर केली नाही. लक्ष्मणही फक्त चार रन्स करू शकला भारताच्या दुस-या इनिंगमध्ये चार विकेटवर 163 रन्स झाले आहेत.

close