रामदेव बाबा यांनी केलेली टीका गैरसमजातून – अण्णा

April 10, 2011 8:42 AM0 commentsViews: 7

10 एप्रिल

जनलोकपाल विधेयकाच्या मसुदा समितीत भूषण पिता- पुत्रांच्या निवडीवर योगगुरु रामदेव बाबा यांनी केलेली टीका ही गैरसमजातून केली असल्याची प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी दिली आहे. रामदेव बाबा यांनी देशहितातून विचार करावा.आमची टीम सर्वोतम आहे, असंही अण्णा म्हणाले आहेत. दरम्यान, रामदेवबाबांनी आपली भूषण पिता-पुत्रांच्या निवडीला विरोध नाही तर या समितीवर किरण बेदी यांची निवड व्हायला हवी होती असं वक्तव्य केलं होतं असा खुलासा ही केला.

close