लोकपाल विधेयकाबद्दल शनिवारी पहिली बैठक

April 10, 2011 9:01 AM0 commentsViews: 1

10 एप्रिल

अण्णा हजारे यांच्या यशस्वी आंदोलनानंतर आता लोकपाल बिलाबद्दलची प्रक्रिया सुरू झाली आहे. लोकपाल बिलाबद्दलची पहिली बैठक येत्या शनिवारी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या कार्यालयामध्ये होणार आहे. प्रणव मुखर्जी हे या विधेयकाच्या मसुदा समितीचे अध्यक्षही आहेत. आपल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या असल्या तरी भ्रष्टाचारविरोधी लढा मात्र सुरूच राहणार असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलंय.

close