मुंबईत मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे प्रवाश्यांचे हाल

April 10, 2011 9:08 AM0 commentsViews: 4

10 एप्रिल

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना तब्बल 15 तासांचा मेगाब्लॉक सहन करावा लागतोय. कुर्ला ते ठाणे या मार्गावर पाचवा आणि सहावा ट्रॅक लोकमान्य टिळक टर्मिनसला जोडण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वेतर्फे शनिवारी रात्री साडेबारा ते रविवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 15 तासांचा मेगाब्लॉक आहे. तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे.या काळात सगळ्या धीम्या अप आणि डाऊन मार्गावरच्या सगळ्या फास्ट गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या मेगाब्लॉकमुळे 100 लोकल्स रद्द करण्यात आल्या आहे. या जम्बोब्लॉकमुळे लोकमान्य टिळक ते मनमाड गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

close