अनुपम खेर यांच्याविरोधात हक्कभंग दाखल

April 10, 2011 9:18 AM0 commentsViews: 5

10 एप्रिल

भारतीय राज्यघटनेबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याबाबत अभिनेते अनुपम खेर यांच्या विरोधात मुलुंडमध्ये आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. काल शनिवारी अनुपम खेर यांच्या घरावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेकही केली होती. तसेच अनुपम खेर यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळेच अनुपम खेर यांच्याविरोधात मुलुंड रेल्वे स्टेशनवर आंदोलन करण्यात आलं. सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला होता.

close