वयाच्या दाखल्यासाठी डॉक्टराने मागितली 100 रूपयांची लाच

April 10, 2011 9:44 AM0 commentsViews: 1

10 एप्रिल

भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकपाल विधेयक व्हावे म्हणून अण्णा हजारेंनी आंदोलन केलं. तर दुसरीकडे अजूनही छोट्या गोष्टींसाठी सर्रास लाच मागितली जातेय. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील सरकारी रुग्णालयात एका वैद्यकीय अधिकार्‍याने वयाच्या दाखल्यासाठी वृध्द महिलेकडून 100 रूपयांची लाच मागितली. हिराबाई पाटे या 65 वर्षांच्या महिलेकडून डॉक्टर सुहास यादव यांनी ही लाच मागितली.

पण हिराबाईंनी याची तक्रार मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांकडे केली. याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.महेन्द्र नगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वृध्द नागरिकांकडून कोणतीही फी आकारली जात नसल्याचे सांगितले आणि जर अशी घटना घडली असेल तर योग्य चौकशी केली जाईल. हिराबाईंच्या धाडसामुळे ही बाब उघडकीला आली पण यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

close