अपहरण करणार्‍या मनसेच्या जिल्हा उपप्रमुखावर कारवाई करण्यास टाळाटाळ

April 10, 2011 10:09 AM0 commentsViews: 1

10 एप्रिल

सांगली जिल्ह्यात मनसेचा जिल्हा उपप्रमुख महेश गव्हाणेवर महाविद्यालयीन युवतीचं अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या घटनेनंतर 15 दिवस उलटले तरी पोलीस कारवाई करायला टाळाटाळ करताहेत असा आरोप मुलीच्या आईनं केला आहे. गव्हाणेला यापूर्वी खंडणीच्या गुन्ह्यातही अटक झाली होती. आणि आता तर त्याने अगदी फिल्मीस्टाईल भरदिवसा संबंधित युवतीचं अपहरण केलं आहे. 23 मार्चला ही घटना घडली. संबंधित तरुणी मिरजेतील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतेय. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण आता क्राईम ब्रँचकडे सोपवलं आहे.

close