जमिनीसाठी वृध्दाची हत्या करणार्‍या हवालदाराला अटक

April 10, 2011 10:20 AM0 commentsViews: 2

10 एप्रिल

ठाण्यातील नौपाडा परिसरातील वामन मडावी नावाच्या 87 वर्षीय वृध्दाची प्रॉपर्टी विकण्याच्या प्रयत्नातून हत्या करणार्‍या रवी परब या खंडणीविरोधी पथकातील पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. काल रवी परबने दगडाने ठेचून वामन मडावी यांचा खुन केला होता. कोट्यावधीे रुपयांची जमीन विकण्यासाठी हा हवालदार रवी परब वृद्धावर दबाव टाकत होता. भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे ठाण्यात खळबळ माजली आहे.

close