चांगल्या प्रकल्पांचे श्रेय लाटायचा प्रयत्न होऊ देणार नाही – मुख्यमंत्री

April 10, 2011 3:36 PM0 commentsViews: 1

10 एप्रिल

पुण्याशी निगडीत म्हाडाचे प्रश्न असतील किंवा एफएसआयचे ते सगळे प्रश्न लवकरात लवकर सोडवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. चांगल्या प्रकल्पाचे कोणी श्रेय लाटायचा प्रयत्न करणार असेल तर ते होऊ देणार नाही असंही ते यावेळी म्हणाले. पुण्यामध्ये आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, उल्हास पवार उपस्थित होते.

close