सांगलीत सरकारी रुग्णालयात अपुर्‍या सोई सुविधाअभावी रुग्णांचे हाल

April 10, 2011 3:44 PM0 commentsViews: 3

10 एप्रिल

सांगलीतील डॉ.वसंतदादा पाटील सरकारी रुग्णालय अपुर्‍या सोई सुविधाअभावी आजारी आहे. या रुग्णालयातील गैरसोयींमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. औषध, शस्त्रक्रियेच्या उपकरणांची कोट्यवधींची बिल गेल्या दोन वर्षांपासून थकित आहेत. त्यामुळे इथं औषधाअभावी फक्त तपासणी सुरु आहे. अनेक रुग्णांना बाहेरुन औषध विकत घ्यावी लागत आहेत. पूर्वी नाममात्र असणार्‍या उपचाराच्या फीच्या रकमेत वाढ करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणं नसल्याने अनेक शस्त्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासून झालेल्याच नाहीत. मात्र रुग्णालयात औषधाचा तुटवडा असूनही उपचार व्यवस्थित सुरु असल्याचा दावा येथील डॉक्टरांनी केला आहे.

close