पुणे वॉरियर्सचा दमदार विजयी प्रवेश

April 10, 2011 5:39 PM0 commentsViews: 28

10 एप्रिलसहारा पुणे वॉरियर्सनं आaयपीएलमध्ये दमदार पदार्पण केलंय. आयपीएलमधील आपल्या पहिल्याच मॅचमध्ये पुणे टीमनं किंग्ज इलेव्हन पंजाबचा 7 विकेट आणि 7 ओव्हर राखून पराभव केला. पुणे टीमच्या भेदक बॉलिंगसमोर पहिली बॅटिंग करणार्‍या किंग्ज इलेव्हनला 8 विकेट गमावत केवळ 112 रन्स करता आले. मॅक्लेरेनवगळता एकाही बॅट्समनला मोठा स्कोर करता आला नाही. विजयाचे हे माफक आव्हान सहारा पुणे वॉरियर्सनं तेरा ओव्हरमध्येच पार केलं. पंजाबच्या प्रवीण कुमारने मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये ग्रॅहम स्मिथची विकेट घेत पुणे टीमला धक्का दिला. पण यानंतर जेसी रायडर, मिथून मिन्हास, कॅप्टन युवराज सिंग आणि रॉबिन उत्थप्पाने फटकेबाजी करत टीमला शानदार विजय मिळवून दिला.

close