प्रसाद पुरोहितनं बोगस कागदपत्रं बनवली

November 9, 2008 7:32 AM0 commentsViews: 3

9 नोव्हेंबर ,मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेला लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यानं बॉम्बस्फोट करणा-यांसाठी बोगस पुरावे निर्माण केल्याचं तपासात उघडकीस आलं. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सुरू असलेल्या एटीएसच्या तपासात या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार लेफ्टनंट प्रसाद पुरोहित हाच असल्याचं आता स्पष्ट होत आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पुरोहितसह साध्वी प्रज्ञा सिंग, शिवनारायण सिंग, श्यामलाल साहू, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राईकर, जगदिश म्हात्रे, राकेश धावरे यांना अटक करण्यात आली.यापैकी काहीजण निनावी नावांनी वावरत होते, असं आता तपासात उघड झालंय. या दहशतवाद्यांना निनावी नावांनी वावराव ही आयडिया लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याचीच होती आणि त्यासाठी या साथीदारांना खोटी ओळख निर्माण करण्यासाठी मदत केली होती. पुरोहित हे बराच काळ जम्मू आणि काश्मीर इथं नियुक्त होते. तिथं त्यांची नियुक्ती मिलिटरीच्या गुप्तचर विभागात होती. यावेळी त्याची ओळख बोगस कागदपत्र बनवणा-यांसोबत झाली होती. त्याचा वापर करून त्याने समीर कुलकर्णी,अजय राईकर, राकेश धावरे, शिवनारायण सिंग, श्यामलाल साहू, वॉण्टेड आरोपी रामजी आणि इतरांची बोगस कागदपत्रं बनवल्याची एटीएसच्या सूत्रांचं म्हणणं आहे. प्रामुख्याने बोगस ओळखपत्र, ड्राईव्हिंग लायसन्स या स्वरूपातील ही कागदपत्रं आहेत. काश्मीर येथून ही कागदपत्रं आणली आणि पुणे येथे बनवली गेली. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची गेली चार दिवस तपास सुरू आहे. यावेळी त्याने ही माहिती दिल्याचं समजतं. यामुळे याबाबत एटिएसच्या पुणे युनीटने काल गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एटीएसचे पीआरओ दिनेश अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता,याबाबत आपल्या काही माहित नाही, तसं असलं तरी तो तपासाचा भाग आहे, यामुळे मी काही बोलू शकत नाही,असं सांगितलं.

close