राळेगणसिद्धीत आज साजरा होणार गुढीपाडवा

April 11, 2011 9:57 AM0 commentsViews: 3

11 एप्रिल

लोकपाल विधेयकावरून मतभेद आणि शाब्दिक युद्ध रंगलं असलं तरी इकडे राळेगणसिद्धीमध्ये आज खर्‍या अर्थाने गुढीपाडवा साजरा होतोय.लोकपाल विधेयकाच्या रुपाने दिल्लीची लढाई जिंकल्यानंतर अण्णा हजारे आज संध्याकाळी राळेगणसिध्दीला परतणार आहेत. 4 तारखेला गुढीपाडव्याला राळेगणच्या गावकर्‍यांनी सरकारचा निषेध करत काळ्या गुढ्या उभारल्या होत्या. पण लोकपाल विधेयकाची लढाई जिंकून अण्णा हजारो राळेगणसिद्धीत परतत आहेत. त्यामुळे सडे-रांगोळ्या घालून आणि गुढ्या तोरणे ऊभारून राळेगणसिद्धी गावकर्‍यांनी अण्णांच्या स्वागताची तयारी केली आहेत.

तर गावकर्‍यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. राळेगणसिद्धीमध्ये त्यांचं पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात येणार आहे. तब्बल 3 क्विंटल फुलांची ऑर्डर यासाठी देण्यात आली आहे. चैत्रपाडवा आजच साजरा केला जाणार आहे. त्यासाठी गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. लोकाचे तोंड गोड करण्यासाठी 3 क्ंविटल लाडू बनवण्याचे काम सुरु आहे. तसेच 80 ढोलपथकांचा समावेश असलेलं झांजपथक आणि परिसरातील वाद्यवंृदही अण्णांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. राळेगणसिध्दीमध्ये हत्तीवरून साखरही वाटली जाणार आहे.

close