लिलावती हॉस्पिटलवर आयकर विभागाचा छापा

April 11, 2011 10:09 AM0 commentsViews:

10 एप्रिल

मेफअर रिऍल्टी आणि वेस्ट्रा इन्फ्रास्ट्रक्चर यांनी 2002 मध्ये लिलावतीच्या संचालकांना 14 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. त्यामध्ये अनियमितता असल्याचा आरोप करुन संचालकांविरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहे. त्यानंतर लिलावतीच्या पाच संचालकांविरोधात केसही दाखल करण्यात आली.

हॉस्पिटलच्या नावाचा गैरवापर करुन या संचालकांनी मोठ्या प्रमाणात काळा पैसा परदेशात दडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर आयबीएन नेटवर्कनेही याबद्दलच्या बातम्या वारंवार दाखवल्या आहेत. या केसच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने गेल्या बुधवारी सीबीआय, ईडी, सेबी आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली होती.

आता इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकार्‍यांनी हॉस्पिटलच्या अकाऊंट, फायनान्स, पर्चेस आणि बायोमेडिकल विभागाच्या कार्यालयात कागदपत्रांची छाननी सुरु केली आहे. सर्व चार विभागाच्या संगणकाच्या हार्ड डिस्क जप्त करण्यात आल्या आहेत. लिलावती हॉस्पिटलला 14 कोटीचं कर्ज देणार्‍या मेफेर रिऍल्टी आणि वेस्त्रा इन्फ्रास्टरक्चर कंपनीच्या कार्यालयावरही छापे टाकण्यात आले आहेत.

close