शुंगलू समितीचा अहवाल गृहखात्याकडे ; कलमाडींवर कारवाई होणार का ?

April 11, 2011 10:17 AM0 commentsViews: 1

11 एप्रिल

कॉमनवेल्थ भ्रष्टाचाराबद्दलच्या शुंगलू समितीचा रिपोर्ट पंतप्रधान कार्यालयाने गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे. गृहमंत्रालय आता शुंगलू समितीच्या अहवालाच्या आधारे कोणती कार्यवाही करतंय हे महत्वाचे ठरणार आहे. कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी नेमलेल्या शुंगलू अहवालावर अजूनही कारवाई झालेली नाही. या प्रकरणी कोणत्या प्रकारची कारवाई करणार अशी विचारणा पंतप्रधान कार्यालयाने गृहविभागाकडे याआधी केली आहे.

शुंगलू समितीने आपल्या 5 व्या आणि 6 व्या हवालात आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडींवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवला होता. याप्रकरणी दिल्लीच्या राज्यपालांच्या भूमिकेवरही या अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर आता कोणत्या प्रकारची कारवाई करणार आहे याची माहिती तीन महिन्याच्या आत द्या, अस पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं आहे.

close