बिनायक सेन यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलली

April 11, 2011 10:22 AM0 commentsViews: 4

11 एप्रिल

सामाजिक कार्यकर्ते बिनायक सेन यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यांचा अर्ज छत्तीसगढ हायकोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करत सेन यांचा अर्ज फेटाळण्याची कारणे छत्तीसगढ सरकारला विचारली होती. राज्य सरकारने सेन हे माओवादी समर्थक असल्याचे स्पष्टीकरण दिलं होतं. प्रसिध्द वकील आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी हे सेन यांच्यावतीने युक्तीवाद करणार आहेत. बिनायक सेन हे गेल्या दोन वर्षापासून तुरुगात आहेत.

close