नाईट रायडर्स आणि डेक्कन चार्जर्स यांच्यात लढत

April 11, 2011 10:35 AM0 commentsViews: 1

11 एप्रिल

आयपीएल चौथ्या हंगामाची पहिली फेरी संपली. चौथ्या हंगामातल्या सर्व दहा टीम प्रत्येकी एक मॅच खेळल्या आहेत आणि आता आजपासून दुसर्‍या फेरीला सुरुवात होत आहे. आयपीएलमध्ये आज सोमवारी एकच मॅच खेळवली जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि डेक्कन चार्जर्स आमने सामने असतील. दोन्ही टीमला पहिल्या मॅचमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे पहिल्या विजयासाठी दोन्ही टीम उत्सुक असतील. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर ही मॅच खेळवली जाणार आहे.

close