मुंबई महापालिकेच्या बेस्ट समितीवर युतीचा झेंडा

April 11, 2011 10:39 AM0 commentsViews: 4

11 एप्रिल

मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी शिवसेना – भाजपच्या सुनील शिंदे यांची निवड झाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार मसुद अन्सारी यांना हरवून सुनील शिंदे विजयी झाले आहेत. शिंदेंना 9 मत मिळाली तर मसूद अन्सारी यांना 6 मत मिळाली आहेत. या निवडणुकीत मनसेचे नगरसेवक तटस्थ राहिले आहेत.

बेस्ट समितीमध्ये शिवसेना-भाजपाचे संख्याबळ 9 आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे 7 आणि मनसेचा एक सदस्य आहे. हे वर्ष निवडणुकीचे वर्ष असल्याने बेस्टच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे जातात हे महत्त्वाचं होतं. दरम्यान, या निवडणुकीसाठीच्या पिठासीन अधिकारी महापौर श्रद्धा जाधव निवडणुकीसाठी सभागृहात पंधरा मिनिटे उशिरा पोचल्याने काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती.

close