जळगावमध्ये बँकेवर धाडसी दरोडा साडेआठ लाखांची लुट

April 11, 2011 12:21 PM0 commentsViews: 7

11 एप्रिल

जळगावच्या रावेर तालुक्यातील चिनावल गावात सेंट्रल बँकेवर दरोडा पडल्याची घटना घडली आहे. मोटरसायकलवरुन आलेल्या 3 दरोडेखोरांनी साडेआठ लाखांची लुट केली आहे. यावेळी दरोडेखोरांचा विरोध करणारे बँकेचे कर्मचारी गणेश वाणी दरोडोखोरांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाले आहे. दरम्यान, हे तिघंही दरोडेखोर 25 ते 30 वयोगटातील असून ते हिंदी भाषेत बोलत असल्याचे प्रत्यक्षदशीर्ंनी सांगितले आहेत.

चिनावलच्या सेन्ट्रल बँकेत सकाळी 9 वाजता ही शाखा उघडली आणि अवघ्या 10 मिनिटात तोंडावर फडके बांधलेले 3 तरुण बँकेत घुसले. त्या तिघांजवळही पिस्तूल होते. सेफमधून काढलेल्या रकमेला त्यांनी बळजबरीनं ताब्यात घेतलं. या तिघांशी बँकेचे कर्मचारी गणेश वाणी यांनी झटापट केली.तिघांपैकी दोघा दरोडेखोरांनी वाणी यांच्यावर हल्ला केला. तर एकानं हातातील चाकूनं त्यांच्यावर वार केला तर दुसर्‍यानं हातीतील पिस्तूलानं वाणी यांच्यावर गोळी झाडली. जवळ असलेल्या युरीयाच्या थैलीत त्यांनी रोख रक्कम तातडीनं भरली आणि बँकेबाहेर उभ्या केलेल्या बिना नंबरच्या मोटरसायकलवरुन खिरोद्याच्या दिशेनं हे तिघही फरार झाले. बँकेत 4 कर्मचारी आणि 6 ग्राहकांच्या समोर हा प्रकार घडला. हे तिघही दरोडेखोर 25 ते 30 वयोगटातील असून हिंदी भाषेत बोलत होते. पोलिसांनी नाकाबंदी जरी केली दरोडेखोरांना पकडण्यात अजूनपर्यंत यश मिळालं नाही. जवळपास 8 लाख 30 हजाराची रक्कम या दरोड्यात लुटली गेली आहे.

close