नागपूरमध्ये फूलशेतीचा यशस्वी प्रयोग

November 9, 2008 7:40 AM0 commentsViews: 34

9 नोव्हेंबर, नागपूरकल्पना नळसकरपारंपारिक कपाशी, सोयाबीन आणि तूर ही खरीप पिकं घेऊनही विदर्भातले शेतकरी सतत आर्थिक विवंचनेत दिवस काढत आहेत. पण याउलट नागपुरातल्या गिरोला या छोट्याशा गावातल्या शेतकर्‍यांच्या जीवनात फूलशेतीचा आनंद दरवळतोय.नागपूरपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे गिरोला गाव. तिथल्या प्रशांत काकडे यांची फुलांची शेती गेल्या 15 वर्षांपासून दरवळत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थितीही सुधारली आहे. ' आधी आम्ही कपाशी, सोयाबीन पेरायचो पण ते परवडत नव्हतं कपाशीचं पीक वर्षातूनएकदा येतं, पण फुलांची शेतीत 3 महिने फुलांचा बार असतो. ' असं प्रशांत काकडे यांनी सांगितलं. प्रशांत यांना होत असलेला फायदा बघून इतर गावकर्‍यांनीहीफुलांची शेती करायला सुरवात केली. सुमारे 500लोकसंख्येच्या गावात आता सर्वच शेतकरी फूलशेती करत आहेत. फुलांची शेती हे या गावाचं आता वेगळंपण ठरलंय. जवळपास 50 एकरावर शेवंती, गुलाब, झेंडूची लागवड केली जाते.एकरी लागवडीचा खर्च वजा जाता शेतकर्‍यांना फुलांच्या शेतीत एक ते दीड लाखापर्यंत फायदा होतो. नापिकीचा सामना करावा लागणार्‍या विदर्भातल्या इतर शेतकर्‍यांसाठी गिरोला गावातली फुलांची शेती नक्कीच आदर्श ठरते.

close