कोल्हापूरमध्ये बार असोसिएशनचं रास्ता रोको आंदोलन

April 11, 2011 2:43 PM0 commentsViews: 2

11 एप्रिल

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरमध्ये व्हावे या मागणीसाठी आज सोमवारी कोल्हापुरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. बार असोसिएशन आणि विविध संघटनांच्यावतीने पुणे-बंगळूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. महापौर वंदना बुचडे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे तासभर वाहतुकीची कोंडी झाली. गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापुरात खंडपीठ स्थापन व्हावं अशी मागणी गेली कित्येक वर्ष सुरु आहे. खंडपीठ झाल्यास कोल्हापूरसह सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्हातील पक्षकारांना याचा लाभ मिळणार आहे.

close