अनुपम खेर यांच्या प्रतिकारात्मक पुतळ्याच दहन

April 11, 2011 9:47 AM0 commentsViews: 3

11 एप्रिल

भारतीय राज्य घटनेसंदर्भात अवमानजनक विधान केल्याबद्दल अनुपम खेर यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आरपीआय च्या कार्यकर्त्यांनी आज दादर परिसरात आंदोलन केलं. अनुपम खेर यांच्या प्रतिकारात्मक पुतळ्याच दहन ही कार्यकर्त्यांनी केलं. दादर टी टी भागात रिपाई कार्यकर्त्यांनी नारेबाजी करुन परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलिसांनी 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तर मनमाडमध्येही अनुपम खेर यांचा प्रतिकात्मक पुतळा मनमाडमध्ये जाळण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आरपीआयच्या वतीनं हे निषेध आंदोलन करण्यात आलं.

close