पिंपरी चिंचवडमध्ये गारपिटीसह पावसाची हजेरी

April 11, 2011 6:05 PM0 commentsViews: 3

11 एप्रिलएकीकडे उन्हाचा पारा वाढतोय, लोक उन्हानं हैराण झालेत, यातच मात्र पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांची आज या उकाड्यापासून थोडावेळा सुटका झाली. कारण आज दुपारच्या सुमारास इथं गारपीट झाली. अचानक झालेल्या या गारपिटीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मग ऐन उन्हाच्यावेळी आलेल्या या पावसाचा आनंद लुटण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले. तब्बल दोन तास हा पाऊस सुरू होता.

close