कंदहार विमान अपहरण प्रकरणी अब्दुल रौफला चिलीमध्ये अटक

April 11, 2011 4:28 PM0 commentsViews: 3

11 एप्रिल

1999 साली झालेल्या कंदहार विमान अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल रौफ याला चिलीमध्ये अटक करण्यात आलं आहे. आयसी-814 या विमान अपहरणात त्याचा हात होता. चिली पोलिसांनी त्याला अटक केली. आता त्याला ताब्यात घेण्यासाठी सीबीआय आणि आयबीची पथकं उद्या चिलीला जाणार आहेत. अब्दुल रौफ हा कुख्यात दहशतवादी मौलाना अझहर याचा मेव्हणा आहे. बनावट व्हिसा वापरून प्रवास करत असताना रौफला चिली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे पाकिस्तानचा व्हिसा होता. जेव्हा विमानाचं अपहरण झालं. त्यावेळी रौफ हा विमानातल्या त्याच्या साथीदारांशी सतत संपर्कात होता असं सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटलं आहे.

close