वॉटसनने ठोकले पंधरा सिक्स

April 11, 2011 6:14 PM0 commentsViews: 4

11 एप्रिल

ऑस्ट्रेलियन टीमने बांगलादेशविरुद्धच्या दुसर्‍या वन डेत नऊ विकेट राखून विजय मिळवला.आणि या मॅचमध्ये ओपनर शेन वॉटसनने एकाच इनिंगमध्ये पंधरा सिक्स ठोकण्याचा रेकॉर्ड केला. ऑस्ट्रेलियन टीमला विजयासाठी 230 रन्स हवे होते. वॉटसनने पहिल्याच ओव्हरमध्ये तीन फोर मारत सुरवातच दणक्यात केली. आणि त्यानंतर त्याने फोर नाही तर सिक्सची बरसात सुरु केली. त्याने तब्बल पंधरा सिक्स ठोकले.

आणि यातला प्रत्येक सिक्स बॉल थेट प्रेक्षकांमध्ये गेला. अखेर ऑस्ट्रेलियाने 231 रन्सचं आव्हान 26व्या ओव्हरमध्येच पार केलं. तेव्हा वॉटसन 185 रनवर नॉटआऊट होता. आणि यासाठी त्याने फक्त 95 बॉल घेतले. त्याच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने या सीरिजमध्ये 2-0ने विजयी आघाडी घेतली.

close