आसाममध्ये 70 टक्के मतदान

April 11, 2011 4:59 PM0 commentsViews: 4

11 एप्रिल

आसाममध्ये सोमवारी दुसर्‍या आणि अंतिम टप्प्यात एकूण 64 जागांसाठी मतदान झालं. आसाममध्ये एकूण 126 जागा आहेत, त्यासाठी दोन टप्प्यात मतदान झालं. सोमवारी झालेल्या मतदानात विद्यमान पाच कॅबिनेट मंत्री आणि प्रफुल्लकुमार महांतो हे माजी मुख्यमंत्री रिंगणात होते. आसाममध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दुसरा आणि शेवटचा टप्पा झाला. आजही पहिल्या टप्प्याप्रमाणेच उच्चांकी 70 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. काही ठिकाणी किरकोळ संघर्षाच्या घटना घडल्या. पण एकंदरीत मतदान शांततेत पार पडलं. दुसर्‍या टप्प्यात 496 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

close