होम लोन घेण्यास वातावरण पोषक

November 9, 2008 7:57 AM0 commentsViews: 6

9 नोव्हेंबर, मुंबईऋतुजा मोरेमार्केटमध्ये पैसै खेळता राहण्यासाठी रिझर्व बँकेनं सीआरआर आणि रेपो रेटमध्ये कपात केली. पाठोपाठ सर्व बँकांनीही कर्जावरचे व्याजदर कमी केले. त्यामुळं इतके दिवस होमलोनचे चढे असणारे दर कमी झाले. या कमी झालेल्या व्याजदराचा फायदा नवीन घर खरेदीसाठी नक्कीच करून घेता येऊ शकतो.होमलोन घेतलंय तर ईएमआय भरावाच लागेल. आणि सध्या बँकांचे व्याजदर कमी झालेत. त्यामुळं नवीन घर खरेदी करणार्‍या ग्राहकांना आता हा ईएमआय भरणं आवाक्यात येणार आहे. मुंबईसारख्या भागात तीन रुमच्या फ्लॅटची किंमत 15 ते 20 लाखांच्या घरात आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना थोडीशी कॉस्ट कटिंग करावीच लागते.घराचं लोकेशन सगळ्या सोयीसुविधांच्या जितकं जवळ तितकी किंमत जास्त. सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी आहे. आता भाव कमी झाले असले तरीही, येत्या काही दिवसांत जागांचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचं बिल्डर्सचं म्हणणं आहे. वाढलेले व्याजदर आणि घरांच्या किंमती यामुळे ग्राहक गेले अनेक महिने वेट अ‍ॅण्ड वॉचच्या मूडमध्ये होते. पण सध्याच्या परिस्थितीत जागांचे भाव कमी झालेत आणि व्याजदरही. वाढलेले व्याजदर आणि घरांच्या किंमती यामुळे ग्राहक गेले अनेक महिने वेट अ‍ॅण्ड वॉचच्या मूडमध्ये होते. पण सध्याच्या परिस्थितीत जागांचे भाव कमी झालेत आणि व्याजदरही. तेव्हा आपलं घराचं स्वप्न पूर्ण कराण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला हरकत नाही

close