किंग खानच्या चेहर्‍यावर अखेर हसू फुलले

April 11, 2011 6:21 PM0 commentsViews: 2

11 एप्रिल

आयपीएलच्या चौथ्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या पहिल्या विजायची नोंद केली आणि किंग खान शाहरुखच्या चेहर्‍यावर हसू फुललं. घरच्या मैदानावर खेळणार्‍या कोलकाता नाईट रायडर्सने डेक्कन चार्जर्सचा 9 रन्सनं पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या कोलकाता नाईट रायडर्सने दमदार बॅटिंग करत 4 विकेटच्या मोबदल्यात 163 रन्स केले.

ऑलराऊंडर जॅक कॅलिसने 54 रन्सची मॅचविनिंग कामगिरी केली. याला उत्तर देताना डेक्कन चार्जर्सच्या टीमला 8 विकेट गमावत 154 रन्स करता आले. भरत चिपली आणि डॅनिअल ख्रिस्टियनने विजयासाठी चांगली झुंज दिली. पण कोलकाताच्या बॉलर्सने दमदार कामगिरी करत डेक्कनला पराभवाचा धक्का दिला.

close