अण्णांची भूमिका लोकशाहीला मारक – अडवाणी

April 12, 2011 9:13 AM0 commentsViews: 1

12 एप्रिल

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी लोकपाल विधेयकासाठी आंदोलन करणार्‍या अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहेत. अण्णांचा मार्ग लोकशाहीविरोधी असल्याचं अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय. अडवाणी म्हणतात, 'राजकारण आणि राजकारणी यांच्याविरोधात तिरस्काराचे वातावरण निर्माण करणार्‍यांची भूमिका लोकशाहीला मारक आहे. बाबा रामदेव आणि अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधात आंदोलन करून लोकांची वाहवा मिळवलीय. विरोधकांच्या मागणीमुळे सरकार जेपीसीची स्थापना करायला तयार झालं आणि आता अण्णांच्या आंदोलनामुळे लोकपाल कायद्याच्या मसुद्यासाठी तयार झालं. सध्याचं सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार आहे. असं असलं तरी देशात अजून काही चांगले नेते आहेत. जे लोकांना भविष्याबद्दल आशावाद आणि विश्वास देऊ शकतात.

close