कोल्हापूरमध्ये मंदिराच्या गाभार्‍यात महिला प्रवेश बंदी उठवावी !

April 12, 2011 9:25 AM0 commentsViews: 2

12 एप्रिल

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात स्त्रियांना पूजा आणि अभिषेक करण्यासाठी गाभार्‍यात यायला बंदी आहे. या बंदीला आता विरोध होतेय. महिलांनी ही बंदी उठवण्याची मागणी केली आहे. तर अंनिसचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांनीही या बंदीला विरोध केला आहे. राज्य सरकारने पुढाकार घेऊन ही बंदी उठवावी असं आव्हानं त्यांनी केलंय.

स्त्रियांना मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन अभिषेक करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी मनसेचे, आमदार राम कदम यांनी काल सभागृहात केली होती. कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनाला येणार्‍या भाविकांनीही या प्रथेबद्दल नाराजी व्यक्त केली आणि स्त्रियांनी गाभार्‍यात प्रवेश देण्याची मागणी केली.

close